Ad will apear here
Next
‘डॉ. आंबेडकर स्मारकाला गती’
मुंबई : इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. कारण मुंबईतील इंदू मिलची जागा राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाकडून महाराष्ट्र सरकारकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया शनिवारी, २५ मार्च रोजी पूर्ण झाली. त्यामुळे स्मारक उभारणीच्या कामाला गती मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले. ‘महान्यूज’ने त्या संदर्भातील वृत्त दिले आहे.

त्या वेळी मुख्यमंत्री म्हणाले, ‘आमच्या सरकारने इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याच्या कामाला वेग दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. अवघ्या तीन दिवसांत पंतप्रधानांनी इंदू मिलची जागा महाराष्ट्र सरकारकडे हस्तांतरित करण्यासाठी तत्त्वत: मंजुरी दिली. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळानेही या संदर्भात निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात राज्य सरकारतर्फे स्मारकाचे काम सुरू करण्यात आले. त्यासाठी निविदा प्रक्रिया झाली. पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले; मात्र इंदू मिलची जागा कायदेशीररीत्या महाराष्ट्र सरकारच्या नावावर हस्तांतरित झालेली नव्हती.’

‘या संदर्भात शनिवारी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्यासोबत विधानमंडळात बैठक झाली. त्या वेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित होते. इंदू मिलची जागा महाराष्ट्र सरकारला हस्तांतरित करण्यासंदर्भातील कागदपत्रे या बैठकीत देण्यात आली,’ असेही फडणवीस म्हणाले. त्यांनी मोदी आणि आठवले यांचे आभार मानले.

केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन ऑगस्ट २०१६ रोजी बैठकीत इंदू मिलची जागा राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्यासाठी मंजुरी दिली होती. आता प्रत्यक्ष ताबा मिळाल्याने निविदा प्रक्रिया पूर्ण करून स्मारकाचे काम तातडीने पूर्ण करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले. 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AYYUBA
Similar Posts
‘बाबासाहेबांचे स्मारक दृष्टिपथात’ मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकासाठी इंदू मिलच्या जागेसंबंधीचे दस्तऐवज केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नुकतेच सुपूर्द केले. त्यामुळे डॉ. आंबेडकर यांचे भव्य स्मारक तयार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे भाजप अनुसूचित
‘आरबीके’च्या विद्यार्थ्याचे यश मुंबई : आर. बी. के. एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये सातवीत शिकणाऱ्या आदित्य श्रीवास्तव या विद्यार्थ्याला ‘नॅशनल अचिव्हर्स अॅवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले आहे. एक हजार रुपये, ‘मॅप माय स्टेप डॉट कॉम’चे प्रीपेड स्क्रॅच कार्ड, सीडी, सुवर्णपदक व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. त्याने नॅशनल लेव्हल
उलगडले समकालीन हिंदी कवितांचे जग दादर (मुंबई) : साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टच्या आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्रातर्फे ‘कवितासमय’ ही वर्तमानातील अस्वस्थता व्यक्त अरणाऱ्या समकालीन हिंदी कवितांची मैफल १० मार्च रोजी दादरच्या साने गुरुजी विद्यालयात झाली. या कार्यक्रमाची संकल्पना ज्येष्ठ कवी, चित्रकार, समीक्षक गणेश विसपुते यांची होती
शिवसेनेची सावध पावलं, महापौरपदासाठी गट स्थापन.. मुंबई महापालिकेत महापौर कुणाचा? या प्रश्नाचं उत्तर अद्याप कुणाकडेच नाही. मात्र शिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आणि शिवसेनेला समर्थन दिलेले अपक्ष नगरसेवक आज कोकण भवनावर जाऊन गट स्थापन करणार आहेत. महापौर निवडीच्या दिवशी दगाफटका टाळण्यासाठी शिवसेनेनं हे पाऊल उचललं आहे. शिवसेना आणि भाजप

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language